मिशन विधानसभा: मावळच्या रणधुमाळीत ‘का’ झाले लहानगीला अश्रू अनावर? ‘‘व्हिडिओ व्हायरल’’
आमदार सुनील शेळके यांनी काय कमावले नक्की पहा : विकासकामांबाबत विरोधकांना चिमुकलीने का सुनावले खडेबोल?
![Mission Vidhan Sabha: 'Why' did Lanagi shed tears in the battle of Maval? "Video Viral"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Sunil-Shelake-780x470.jpg)
पिंपरी : विधानसभेची रणधुमाळी आता चांगलीच तापली आहे. या तापलेल्या वातावरणात मावळ विधानसभेमध्ये एका चिमुरडीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधून ही लहानगी मावळ विधानसभेतील महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विषयी विरोधकांना खडे बोल सुनावताना दिसत आहे. हे सांगताना ही चिमुकली अक्षरशः भावनिक झाली आहे. तिचा गळा दाटून आला आणि आमदार सुनील शेळके हेच या विधानसभेसाठी चांगले उमेदवार आहे असेही ती सांगताना दिसत आहे.
महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मावळच्या आखाड्यात सुनील शेळके यांना पुन्हा संधी दिली आहे. सुनील शेळके यांना विरोधकांनी सध्या घेरण्याचा प्रयत्न केला आहे. चार-दोन विरोधी नेत्यांच्या आधारे मतदार संघात ‘‘मावळ पॅटर्न’’ चर्चेत आणला जात आहे. मात्र, आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांना आव्हान देत ‘शेळके पॅटर्न’ राबवण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, सोशल वॉर सुरू असताना एका व्हिडिओमध्ये ही चिमुकली सांगते, ‘‘माझे मतदानाचे वय नाही. मात्र, परिस्थिती मी समजू शकते. माझ्या आसपास गेल्या पाच वर्षात झालेला बदल मला दिसत आहे. सुनील शेळके हे किती चांगले काम करत आहेत. चांगले रस्ते झालेले मी पाहत आहे. आम्हाला शाळेपर्यंत जायला चांगला रस्ता झाला आहे. शाळेतल्या सोयी सुविधा वाढल्या आहेत हा बदल सगळ्यांना दिसत नाही का? असा सवालही ती उपस्थित करीत आहे. तसेच, मावळच्या विकासासाठी आमदार सुनील शेळके यांना मतदान करा, असे आवाहनही करताना दिसते.