ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मिशन PCMC: प्रभाग १० अ मध्ये मतदारांचा सूर स्पष्ट : “विश्वास जुना… अनुराधाताईच पुन्हा”

मतदारांचा प्रतिसाद: अनुराधाताई गोरखे यांच्या प्रचाराला भाजपमधील दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० अ मधून भाजपकडून इच्छुक अनुसूचित जाती महिला उमेदवार श्रीमती अनुराधाताई गोरखे यांच्या प्रचाराने स्पष्टपणे आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचाराच्या प्रत्येक फेरीत नागरिकांचा, विशेषतः महिलांचा, उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून संपूर्ण प्रभागात महिलांची लाट निर्माण झाल्याचे वातावरण आहे.

अनुराधाताई गोरखे यांच्या प्रचाराला भाजपमधील दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन लाभत असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. प्रचारादरम्यान अनुराधाताई स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत असून, नागरिकांकडून मांडण्यात येणाऱ्या समस्या, अपेक्षा आणि विकासविषयक सूचनांची त्या बारकाईने नोंद घेत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वासही त्या नागरिकांना देत आहेत.

यंदा प्रभागात महिलांच्या न्याय, सन्मान आणि हक्कांसाठी “या वेळी मतदान फक्त अनुराधाताई गोरखेंनाच” असा निर्धार प्रभागातील महिलांनी व्यक्त केला आहे. “अनुराधाताई यांना महापालिकेत मोठ्या मताधिक्याने पाठवायचेच” असा निश्चय महिलांनी जाहीरपणे मांडला आहे.

प्रचारादरम्यान महिलांकडून ठिकठिकाणी औक्षण, पुष्पवृष्टी व सत्कार करत अनुराधाताईंचे स्वागत केले जात असून, यामुळे प्रचाराला अधिक गती मिळत आहे. महिला शक्ती एकवटल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

घराघरांतून व वस्तीपातळीवर सुरू असलेल्या संवादामुळे अनुराधाताई गोरखे यांचा जनसंपर्क दिवसेंदिवस वाढत असून, त्यांचा प्रचार प्रभावीपणे मुसंडी मारत आहे. विकास, महिलांचे प्रश्न, मूलभूत सुविधा, सुरक्षितता आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडत अनुराधाताई प्रभागातील मतदारांचा विश्वास संपादन करत असल्याचे चित्र सध्या प्रभाग क्रमांक १० मध्ये दिसून येत आहे.

विकासाचा स्पष्ट दृष्टीकोन, आदर्श शिक्षिका म्हणून समाजात निर्माण झालेली विश्वासार्ह ओळख आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता यामुळे “प्रभागाचा विकास फक्त आणि फक्त अनुराधाताई गोरखेच करू शकतात” असा ठाम विश्वास नागरिकांमध्ये आहे. म्हणूनच आज प्रभागातील महिला एकसुरात म्हणत आहेत “विश्वास जुना… अनुराधाताईच पुन्हा.”

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button