मावळातील जनतेला सुख-समृद्धी, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य लाभो
मावळ विधानसभा निवडणुक प्रमुख रवींद्र आप्पा भेगडे यांचे गणराया चरणी साकडे
गणरायाचे दर्शन व जनतेशी संवाद साधत भेगडे यांचा तालुका पिंजून काढण्याचा “श्रीगणेशा”
वडगांव मावळः राज्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली शेती होऊन शेतकऱ्यांना चांगले दिवस येवो तसेच सर्वांना सुख-समृद्धी, ऐश्वर्य व उत्तम आरोग्य लाभो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत अशी गणराया चरणी प्रार्थना करत भेगडे यांनी तालुका पिंजून काढण्याचा “श्रीगणेशा” केला आहे.मावळातील जांभुळ येथील “एक्झर्बिया ॲबोड” सोसायटीमधील सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाने आयोजित केलेल्या गणेशोत्सवात पहिल्याच दिवशी मावळ तालुका भाजपा निवडणूक प्रभारी रविंद्र आप्पा भेगडे यांच्या हस्ते आरतीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी गणराया चरणी त्यांनी साकडे घातले. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच सोसायटीमधील सर्व रहिवाशी प्रामुख्याने उपस्थित होते. गणरायाचे दर्शन व जनतेशी संवाद साधत भेगडे यांनी तालुका पिंजून काढण्याचा “श्रीगणेशा” केला आहे.

यावेळी उपस्थित गणेश भक्तांना तसेच सोसायटीमधील रहिवाशांशी संवाद साधताना भेगडे म्हणाले की, मावळ तालुक्याला चांगले दिवस येण्याची आणि सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी येण्याची कामना व्यक्त केली. गणरायाच्या आगमनाने मावळ वासियांना सुखसमृद्धी येवो, असे गणरायाला साकडे त्यांनी यावेळी घातले. पावसाची रिमझिम सुरू असताना “एक्झर्बिया ॲबोड” सोसायटीमधील सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाच्या वतीने पदाधिकारी सोसायटीच्या प्रवेशद्वारावर स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी येथील रहिवाश्यांनी रविंद्र अप्पा भेगडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.
सोसायटीमधील रहिवाशांना अनेक समस्या आहेत. त्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासनदेखील त्यांनी दिले. कोणाचे कसलेही अडीअडचणीचे काम असले तरी आपण तो सोडविण्यासाठी कायम कटिबद्ध असू, अशी ग्वाही देत संपूर्ण देशभर गणरायाचे आमगन झालेले आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे सर्वांना सुबुद्धी मिळो आणि सर्वांना गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळो, अशा शुभकामना यावेळी रवींद्र भेगडे यांनी व्यक्त केल्या.
काही झालं तरी रवी आप्पा आता माघार नाही… गीताने धुमधडाक्यात स्वागत
भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रभारी रविंद्र आप्पा भेगडे यांच्या कार्यावर आणि आगामी धोरणांवर, मावळ तालुक्याच्या प्रकाशझोत टाकणारे प्रचार गीत मावळच्या या दरी खोऱ्यातून एकच आवाज घुमतोय, पेटवला जो स्वाभीमान तो आजही धगधगतोय असे गाण्याचे बोल असलेले प्रचारगीत येथील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाजवून धुमधडाक्यात रवींद्र आप्पा भेगडे यांचे स्वागत करण्यात आले.
एक्झर्बिया अबोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती…
यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रहिवासी लहान-थोर, महिला पुरुष यांची लक्षणीय उपस्थिती होती. मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष पंढरीनाथ हिंगे, खजिनदार योगेश हुले, सचिव दिनेश सकट, मार्गदर्शन प्रकाश कांबळे, बाबासाहेब लभडे, सागर म्हाळसकर, सुमित पुरी, सुनील पवार, शैलेश घाग, कृष्णा लोखंडे, विजय भोरे, माध्यम प्रायोजक सुनील आढाव आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
दरवर्षी आम्ही उत्साहपूर्ण वातावरणात सण, उत्सव साजरे करतो. या वर्षी आमच्या सोसायटीमधील काही बिल्डिंगमधील लाईटच बंद केली आहे. बिल्डरने वीज बिल भरलेले नाही. त्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये अनेक सुविधांची वाणवा आहे. बिल्डरने आम्हाला ज्या सुविधा दिल्या आहेत त्या अपूऱ्या आहेत. आमच्याकडून दोन वर्षांचे विविध कराच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा पैसे वसूल केले. मात्र त्या तुलनेत कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. यासाठी रवी आप्पा आपण आम्हाला सहकार्य करावे.
-प्रकाश कांबळे, मार्गदर्शक, एक्झर्बिया अबोड सार्वजनिक मित्र मंडळ, जांभुळ, वडगाव मावळ





