Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

महाराष्ट्रातील “रेशन धान्याचा’ मोठा भ्रष्टाचार उघडकीस; 4 कोटीची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली  : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याच्या भ्रष्टाचार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने इंडिया मेगा ॲग्रो अनाज लि. कंपनीवर कारवाई केली असून या कंपनीचे मालक अजय बाहेती यांच्या हिंगोली, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांतील एकूण ४ कोटी ६ लाख रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त मालमत्तांमध्ये बाहेती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी विकत घेतलेल्या स्थावर मालमत्तांचा समावेश आहे.

अन्न महामंडळाच्या गोदामातून पुरवल्या जात असलेल्या धान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली होती व बाहेती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. ईडीने सांगितले की, इंडिया मेगा ॲग्रो अनाज कंपनीचे मालक अजय बाहेती हे ट्रक ड्रायव्हर, ट्रक मालक, डिलिव्हरी घेणारे जिल्हा प्रतिनिधी, तहसीलमधील गोदाम किपर यांच्याशी संगनमताने कट करून हा गैरव्यवहार करीत होते.

या धान्याचा भ्रष्टाचार करणाऱ्यांचे हे एक मोठे रॅकेट आहे. त्यात हिंगोली आणि नांदेडचे अनेक व्यापारीही सहभागी असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी धान्य पुरवठ्यांच्या रेकॉर्डमध्येही मोठ्या प्रमाणात फेरबदल केले आहेत. त्यासाठी त्यांनी आधिकाऱ्यांनाही हाताशी धरले हेाते अशीही बाब समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button