ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
अधिवेशनात विरोधकांकडून देखील पुन्हा एकदा राजीनाम्याचा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता

पुणे : मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. विधानपरिषदेचं कामकाज संपल्यानंतर दोघांची भेट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. विधिमंडळ विधान भवनात धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांची भेट घेतली.
हेही वाचा: ‘विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क’; संजय राऊत यांचं विधान
माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणातील आरोपी असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांकडून केली जात आहे. त्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे. तर अधिवेशनात विरोधकांकडून देखील पुन्हा एकदा राजीनाम्याचा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने ही भेट झाली का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.