मोठी बातमी! १७ व्या दिवशी मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं
![Manoj Jarange called off his fast after drinking juice from Chief Minister Eknath Shinde](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/manoj-jarange-patil-and-eknath-shinde-780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्यात उपोषणाला बसले आहेत. गेल्या १७ दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी आले. आल्यावर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीवर हात ठेवला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर मुख्य विषयाला हात घालत त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाचही मागण्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. एका एका मागणीवर सविस्तर माहिती दिली. जरांगे पाटील यांनीही त्यांची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं.
हेही वाचा – बैलपोळा सण का साजरा केला जातो? काय आहे या सणाचे महत्व? जाणून घ्या..
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. जीआरमधील वंशावळीचा उल्लेख काढून टाकावा. ज्या अधिकाऱ्यांनी लाठीमार केला. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावं. सक्तीच्या रजेवर पाठवणं हा त्यावरचा उपाय नाही. तसेच ज्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, आदी मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या आहेत. या मागण्यांवर ते अडून होते. त्यामुळेच त्यांचे उपोषण लांबले.