Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अशोक खरातकडे जाणाऱ्या सगळ्या मंत्र्यांना सहआरोपी करा; संजय राऊतांची मागणी

मुंबई | स्वत:ला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या सिन्नर तालुक्यातील श्री शिवनिका संस्थानचा अध्यक्ष अशोक खरात यास महिलेवरील अत्याचार प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून तब्बल ५८ आक्षेपार्ह चित्रफिती जप्त केल्या असून, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या खरातकडे अनेक बड्या राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींची वर्दळ असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत अशोक खरातच्या दरबारात जाणाऱ्या सत्ताधाऱ्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र हा खूप पूर्वीपासून पुरोगामी, सुधारणावादी विचारांचा महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्रात बुवाबाजी आणि भोंदुगिरी फोफावत असेल तर भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्यांना मंत्र्यांना सहआरोपी केलं पाहिजे. मंत्र्यांना सहआरोपी करेपर्यंत भोंदुगिरी थांबणार नाही. जे कुणी यातून पळवाट काढत आहेत ते खोटं बोलत आहेत. या प्रकारचा पहिला गुन्हा अशोक खरातवर २००३ मधे दाखल झाला आहे.

हेही वाचा       :              महिला आयोगाचा पुढील अध्यक्ष कोण? रोहित पवारांनी सुचवली चार नावे 

नाशिकमधल्या एका वृत्तपत्रात खरातच्या कारनाम्यांबाबत लेखमालाही प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी पत्रकाराला धमक्या देण्यात आल्या. २००३ आणि २००५ या दोन्ही वर्षांत गुन्हे दाखल झाले आहेत तरीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे अशोक खरातकडे जात असतील आणि पूजाविधी करत असतील, जादूटोणा करत असतील तर या सगळ्यांना सहआरोपी केलं पाहिजे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सक्षम पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे जो मुख्य आरोपी पकडला आहे त्याचा जबाब नोंदवून घेतला जातो आहे. कुठलीही मोठी नावं आली तरीही ती दडपली जाणार नाहीत असं संजय राऊत म्हणाले.

दीपक केसरकर आरोप फेटाळत असतील तरीही त्यांच्यावर कुणी विश्वास ठेवू नका. ज्यांना या गोष्टीचे छंद होते त्यांच्यापैकी एक गट एकत्र झाला आणि बाहेर पडला असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला आहे. सुनेत्रा पवारांना जर वाटत असेल आणि अजितदादांचा विचाराने त्या चालत असतील तर रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुनही हटवलं पाहिजे. हा निर्णय सुनेत्रा पवारांनी तातडीने घेतला पाहिजे. कुणाची वाट बघत आहेत त्या? चाकणकरांना हटवण्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, तो त्यांचा निर्णय आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button