ताज्या घडामोडीराजकारण

मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ

लाडक्या बहिणींना १४ जानेवारीपूर्वी तीन हजार रुपये

सोलापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकदम मिळाले. आता निवडणूक संपली, निकाल लागला, आचारसंहिताही संपली, नवीन सरकार सत्तेवर बसले, तरीदेखील डिसेंबरमधील दीड हजार रुपये कधी मिळणार, याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे. आता दरमहा २१०० रुपये नंतर द्या, पण तूर्तास १५०० रुपये मिळावेत, अशा महिलांच्या प्रतिक्रिया आहेत. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख १० हजार लाडक्या बहिणींसह राज्यातील अडीच कोटींहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वीच अर्ज केलेले आहेत. विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये दिवाळीचा बोनस म्हणून त्यांच्या खात्यात जमा केले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षांनी ही योजना बंद केली जाईल, निवडणुकीमुळे सहा महिन्यांपुरतीच ही योजना सरकारने आणली आहे, असे मुद्दे मांडले होते. आता निवडणूक संपली तरीदेखील ना दीड हजार रुपये ना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांमधील कोणीच स्पष्टपणे काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा लाभ कधी मिळणार, असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, आता सत्ता स्थापना, हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी (१४ जानेवारी) दोन हप्ते मिळतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील दहा लाख ४५ हजारांपर्यंत महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केले होते, त्यांना लाभही मिळाला. त्यानंतर १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली गेली, त्या काळातील अर्जांची पडताळणी विधानसभेच्या आचारसंहितेमुळे झाली नव्हती. आता त्या ६५ हजार अर्जांची छाननी सुरू आहे. सर्व पात्र महिलांना निश्चितपणे आगामी काळात योजनेचा लाभ मिळेल.

लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. पण, त्या दरम्यान विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि त्या अर्जांवरील कार्यवाही थांबली. आता आचारसंहिता संपल्यावर त्या अर्जांची छाननी सुरू झाली आहे. याशिवाय काही दिवसांत यापूर्वीच्या अर्जांची देखील पडताळणी होईल, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. पण, सर्व पात्र लाडक्या बहिणींना एप्रिलनंतर दरमहा २१०० रुपये मिळतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button