उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान
![Maharashtra's first Udyogratna Award conferred on industrialist Ratan Tata](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/ratan-tata-780x470.jpg)
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना आज महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धरतीवर या वर्षीपासून उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली होती. त्यानुसार हा पुरस्कार उद्योगपती रतन टाटा यांना देण्यात आला. महिला उद्योजक, मराठी उद्योजक आणि अन्य एकाला असे तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत.
हेही वाचा – ‘मोदींनी भ्रष्टाचाराचा आरोप केले, अन् अजित पवार ६ दिवसांत सत्तेत गेले’; राज ठाकरे
उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
श्री. टाटा… pic.twitter.com/dmodfgwGYJ— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 19, 2023
रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रतन टाटा यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.