Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

नरेंद्र मोदी २०२७ ला राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील; काँग्रेसच्या माजी खासदाराचा दावा

PM Narendra Modi | लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात एनडीचं सरकार स्थापन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जून रोजी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. यातच आता काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. नरेंद्र मोदी २०२७ ला राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील, असं ते म्हणाले आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या संसदेत गर्जत शिवनेरीचा छावा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते.

कुमार केतकर म्हणाले, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ २०२७ ला संपेल. मला असं वाटतं त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतील की आता मी राष्ट्रपती होतो. माझी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी आहे. मग जर खरोखर ते थोड्याशा मताने निवडून आले आणि राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मत मोजण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे थोड्याशा मताने समजा ते निवडून आले आणि २०२७ ला नरेंद्र मोदी राष्ट्रपती झाले. त्यानंतर ते २०३२ पर्यंत राष्ट्रपती असतील. मग २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाची जरी सत्ता आली तरी नरेंद्र मोदी राष्ट्रपती असतील. त्यामुळे ते काहीही करु शकणार नाहीत. कारण नरेंद्र मोदी राष्ट्रपती असतील. राष्ट्रपती प्रत्येक गोष्ट तुम्हाला आडऊ शकतात.

हेही वाचा    –        शासनाच्या ‘संवादवारी’ उपक्रमास वाल्हे येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोनच इच्छा आहेत. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास नरेंद्र मोदी यांना हिंदु राष्ट्रामध्ये फारसा रस नाही. हिंदु राष्ट्र हवा आहे, पण हिंदु राष्ट्राची नैपत्य रचना करायची. मात्र, नरेंद्र मोदींचा जीव हा फक्त सत्तेमध्ये अडकलेला आहे. ते सत्तेत राहण्यासाठी ते जे शक्य असेल ते करतात. मग राजकीय पक्ष फोडण्यापासून सर्वच, असंही कुमार केतकर म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button