Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

कावडीला राज्याचे पाच कोटींचे पहिले बक्षिस नक्की मिळणार : नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातर्गत विकास उत्सव व महिला सन्मान सोहळा

कुडाळ : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ हे महाराष्ट्रातील ग्रामपंचायती अधिक सक्षम करून ग्रामविकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. गावात राबवल्या जाणाऱ्या या अभियानाचा उद्देश सुशासन, स्वच्छ व हरित गाव आणि लोकाभिमुख सेवांद्वारे विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करणे हाच आहे. जावळी सारख्या डोंगरी दुर्गम भागातील कावडी या गावाने या अभियानाअंतर्गत केलेला कायापालट हा निश्चित त्यांचे उदिष्ठ पुर्ण करण्यासाठी कामी येईल व राज्याचे पहिल्या क्रमांकाचे पाच कोटींचे बक्षिस कावडी गावाला मिळेल असा ठाम विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

कावडी ता.जावळी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कावडी ग्रामपंचायत विकास उत्सव आणि महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नामदार भोसले बोलत होते, यावेळी नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सैा. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्य वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री गिरी, जावली पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक, भाजप मंडल अध्यक्ष संदीप परामने, जावली बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे, माजी अध्यक्ष चंद्रकांत गावडे, बाजार समितीचे सभापती जयदिप शिंदे, भाजप प्रवक्ते सुरेश गायकवाड, हणमंतराव पार्टे, समाधान पोफळे, अभिनेत्री संजना काळे, अभिनेते संदीप पाठक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा –  बँक लॉकरमधून लाखोंचे दागिने गायब झाल्यावर किती नुकसान भरपाई मिळते? अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केला नियम

पुढे बोलताना नामदार भोसले म्हणाले, ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी कावडी गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकला असून या अभियानांतर्गत गावात लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून मोठी चळवळ उभी केली आहे, ग्रामस्थांनी श्रमदानातून वसवलेल्या गावात केलेले अमुलाग्र बदल व केलेला विकास वाखाणण्याजोगा असून जिल्हायतील गावांनी आदर्श घेण्यासारखा आहे, भविष्यात तालुक्याचे रोल माँडेल म्हणून या गावाला नक्कीच पाहीले जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजप मंडल अध्यक्ष संदीप परामने यांनी उपस्तितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.

शिवेंद्रराजेंमुळेच सर्व शक्य…

ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे बोलताना म्हणाले, राज्यात एक नंबर बक्षिस आणण्यासाठी गावातील ग्रामस्थ, महिला व युवकांनी स्वताचा बहुमोल वेळ देऊन श्रमदान केले आहे, अभियानाचे सर्व निकष पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन वेळप्रसंगी लोकवर्गमी गोळा करून गावाचा कायापालट केला आहे, धरणामुळे गाव बाधीत झाल्यानंतर सपंर्ण गावाची नव्याने रचना करून डेंगरालगत गाव वसवले आहे, यासाठी ग्रामस्तांची मोठी जिद्द व मेहनत यासाठी आम्ही केली आहे त्याचे फळ या योजनेचे पहिले बक्षिस आम्हाला मिळाल्यानंतर नक्की मिळेल, असा विश्वास व्यक्त करून नामदार शिवेंद्रराजे यांच्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

छोटाशा गावात विकासाचा डोंगर…

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सैा.प्रिया शिंदे बोलताना म्हणाल्या, वसंतराव मानकुमरे यांनी सर्वांना एकत्रितघेऊन विकास संधीचे सोने या निमित्ताने केले आहे, एका छेटाशा गावात विकासाचा डोंगर उभा करत याअभियानाला साजेशे काम करून दाखवले आहे. गावच्या विकासात ग्रामपंचायतीचा सिंहाचा वाटा असून भविष्यातजिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. लवकरच आरोग्यादायी सातारा जिल्हा निर्माण करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांनी संपुर्ण गावाची पाहणी केली त्यानंतर गावातून त्यांची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुक काढण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button