“अत्याधुनिक संशोधन व नवोपक्रम” राष्ट्रीय सेमिनार उत्साहात
शिक्षण विश्व : गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत आयोजन

पिंपरी-चिंचवड : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एमसीए अँड मॅनेजमेंट, आकुर्डी येथील आंतरगत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) तर्फे “अत्याधुनिक संशोधन व नवोपक्रम” या विषयावर १३ व १४ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील सेमिनार यशस्वीरीत्या पार पडला.
या सेमिनारसाठी संस्थेच्या संचालक डॉ. के. निर्मला यांचे मार्गदर्शन लाभले, तर उपप्राचार्या व विभागप्रमुख डॉ. कविता सूर्यवंशी यांनी संयोजिका म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. उद्घाटन सत्रात रिअर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त), कॅम्पस डायरेक्टर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेश एन. पहूरकर (PUMBA, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) उपस्थित होते. त्यांनी संशोधनातील संधी, गुणवत्ता आणि नवोपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच डॉ. सच्चिदानंद आर. कुलकर्णी (SACHK Consulting’s LLP) यांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा – कावडीला राज्याचे पाच कोटींचे पहिले बक्षिस नक्की मिळणार : नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
समारोप समारंभात डॉ. गोरख वाखरे यांनी आभार प्रदर्शन केले. या सेमिनारमुळे संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना संशोधन, नवोपक्रम, प्रकाशन प्रक्रिया व बौद्धिक संपदा हक्क याबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
डॉ. तथागत मुखर्जी यांचे मार्गदर्शन…
मुख्य वक्ते डॉ. तथागत मुखर्जी (Gennova Biopharmaceuticals) यांनी “भक्कम संशोधन पायाभूत रचना उभारणे” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. प्रीती मुळे यांनी संशोधनातील नवकल्पना व संशोधन पद्धतींबाबत विचार मांडले. डॉ. नईम शेख यांनी “अकॅडमिक रायटिंग अँड रिसर्च टूल्स”, तर डॉ. अमृता देशपांडे यांनी “पब्लिशिंग स्ट्रॅटेजीज” या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी डॉ. सम्राट रे यांनी “बिल्डिंग इनोव्हेशन माइंड-सेट फॉर अकॅडेमिशियन्स” या विषयावर प्रेरणादायी सत्र घेतले. डॉ. रमेश मांझा यांनी “इकोसिस्टम्स थ्रू केस स्टडीज” या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. कविता सूर्यवंशी यांनी “क्वालिटी रिसर्च पब्लिकेशन्स” या विषयावर भाष्य केले, तर डॉ. परिक्षित महाले यांनी “आयपीआर अवेअरनेस” विषयावर बौद्धिक संपदा हक्कांविषयी सविस्तर माहिती दिली.





