कसबापेठ मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांना कोण देणार टक्कर?
कसबा विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता
महाराष्ट्र : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या मतदारसंघातून उमेदवारांची यादी ही जाहीर झाली आहे. जवळपास सर्वच पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारांकडून प्रचार ही सुरु झाला आहे. सगळ्याच नेत्यांनी विजयासाठी कंबर कसली आहे. २०२४ ची विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यातच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघ देखील चर्चेत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. त्यामुळे या निवडणुकीत कोणाला निवडून देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. २८ वर्षांपासून येथे भाजपाचे वर्चस्व होते. १९९५ पासून २०१९ पर्यंत गिरीश बापट हे आमदार होते. त्यांच्यानंतर २०१९ मध्ये मुक्ता टिळक या मतदारसंघातून निवडून आल्या. पण २०२३ मध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे धंगेकर विजयी झाले.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून कसबा विधानसभा मतदारसंघामधून हेमंत रासणे रिगंणात आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून पुन्हा रवींद्र धंगेकर रिंगणात आहेत. भाजपकडून कुणाल टिळक, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे हे देखील इच्छूक होते.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात आधी ओबीसी मतदारांचे वर्चस्व होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार येथे एकूण 2 लाख 90 हजार 724 मतदार आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या अंदाजे 27 हजार 864 इतकी आहे, जी एकूण मतांच्या 9.63 टक्के आहे. याशिवाय 42 हजार 823 मुस्लीम मतदार आहेत, म्हणजे एकूण मतांच्या 14.8 टक्के.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार
2023: रवींद्र धंगेकर, काँग्रेस 2019: मुक्ता टिळक, भारतीय जनता पार्टी 2014: गिरीश बापट, भारतीय जनता पक्ष 2009: गिरीश बापट, भारतीय जनता पक्ष 2004: गिरीश बापट, भारतीय जनता पक्ष 1999: गिरीश बापट, भारतीय जनता पक्ष 1995: गिरीश बापट, भारतीय जनता पक्ष 1991 पोटनिवडणूक : वसंत विठोबा थोरात, काँग्रेस 1990: अण्णा जोशी, भारतीय जनता पक्ष 1985 : उल्हास काळोखे, काँग्रेस 1980: अरविंद लेले, भारतीय जनता पक्ष 1978: अरविंद लेले, जनता पक्ष 1972: लीलाबा मर्चंट, काँग्रेस 1967: आर. व्ही. तेलंग, काँग्रेस 1962: बाबुराव सणस, काँग्रेस