‘अजित पवार गट पाकीटमारांची टोळी’; जितेंद्र आव्हाडांची जीभ घसरली

मुंबई | राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे नेहमी परखडपणे आपले मत मांडताना दिसतात. आव्हाडांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचा होता. पण एके दिवशी अजित पवार येतात आणि धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढतात. जाताना त्यांच्याकडी घड्याळ देखील हिसकावून नेतात. ही चोरांची टोळी आहे. अजित पवारांची ही टोळी पाकिटमार आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, की अजित पवारांचा गट हा पाकिटमारांची टोळी आहे. जर तुमच्यात हिंमत होती, तुम्ही मर्दाची औलाद होता, तर मग तुम्ही स्वतःचे वेगळे चिन्ह घेऊन निवडणूक लढवून दाखवायला हवी होती. मग आम्ही तुम्हाला मर्द समजले असते. ज्या काकांनी देशभरात स्वतःचा पक्ष पसरवला आणि वाढवल. त्या पक्षाला तुम्ही माझं माझं म्हणत हिसकावून घेतलं. पण जनतेला सत्य माहीत आहे.
हेही वाचा – ‘१० दिवसांत राजीनामा द्या, अन्यथा तुमचा बाबा सिद्धिकी करू’; योगी आदित्यनाथ यांच्या नावे मुंबईत धमकी
दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी याआधीही अनेकदा चुकीच्या शब्दांचा वापर केला होता, ज्यामुळे ते अडचणीत आले होते. हे त्यांनी लक्षात ठेवले पाहीजे. माझा त्यांना सल्ला आहे की, शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहीजे. आपण कुणाला चोर म्हणतो, कुणाला पाकिटमार म्हणतो, याचा त्यांनी विचार केला पाहीजे. तुमच्याबरोबर जे २० ते २५ वर्ष राहिले, त्यांना सर्वांना हे विधान लागू होते, असं छगन भुजबळ म्हणाले.





