जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर संदर्भातील एक ऑडिओ केला ट्विट
लैंगिक अत्याचारप्रकरणी एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या अक्षय शिंदेच्या मृत्यूवरून शंका उपस्थित
बदलापूर : बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या अक्षय शिंदेच्या मृत्यूवरून शंका उपस्थित केली जात आहे. अशातच शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते, कळवा- मुंब्रा येथील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर संदर्भातील एक ऑडिओ ट्विट केला आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये दोन अज्ञात व्यक्ती अक्षय शिंदेच्या गोळीबारा संदर्भात संभाषण करताना ऐकायला मिळताय. यामध्ये पोलीस व्हॅनच्या मागे स्वतःची गाडी असल्याचा दावा या संभाषणातील एका व्यक्तीने दावा केला आहे. यासबोतच गोळीबाराचे तीन राऊंड ऐकल्याचे ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा आहे.
हा ऑडिओ ट्विट करताना जितेंद्र आव्हाड यांनी असेही म्हटले, अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती.





