इटलीच्या पंतप्रधान मेलोनींचा पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी; पोस्टमध्ये #Melodi हॅशटॅग
![Italian Prime Minister Giorgia Meloni's selfie with Prime Minister Narendra Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Narendra-Modi-and-Giorgia-Meloni-780x470.jpg)
Narendra Modi and Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी सेल्फी शेअर करताना #Melodi असा हॅशटॅग वापरला आहे. त्यांच्या या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
संयुक्त अरब अमिराती येथे नुकतंच ‘वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट’चं (सीओपी-२८ समिट) आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. यावेळी मेलोनी यांनी मोदींसोबत सेल्फी काढला. हा सेल्फी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा – ‘अजित पवरांचे शरद पवरांवरील आरोप क्रीप्टेड’; संजय राऊतांचा घणाघात
Good friends at COP28.#Melodi pic.twitter.com/g0W6R0RJJo
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) December 1, 2023
जॉर्जिया मेलोनी यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘सीपीओ-२८ मधील चांगले मित्र’ असं लिहिलं आहे. तर Meloni आणि Modi असे दोन शब्द एकत्रित करत इटलीच्या पंतप्रधानांनी Melodi असा हॅशटॅग वापरला आहे. मेलोनी यांनी पोस्टमध्ये वापरलेल्या हॅशटॅगवरून सोशल मीडियावर विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.