Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

बहिणीचे रक्षण करणे ही भावाची जबाबदारी: माजी आमदार अश्विनीताई जगताप

सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या न्यू होम मिनिस्टरचे बक्षीस वितरण

पिंपरी-चिंचवड : बहीण भावाचे जिव्हाळ्याचे नाते असते. वेळ प्रसंगी बहिणीचे रक्षण करणे ही भावाची जबाबदारी असते. सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता बहिणींच्या रक्षणाची जबाबदारी घेतली आहे हे खूप कौतुकास्पद आहे असे माजी आमदार अश्विनीताई जगताप यांनी सांगितले.

पिंपळे निलख येथे सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने महिला भगिनींसाठी भाऊबीज या थीमवर न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमातील विजेत्या महिलांना माजी आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

यावेळी आयोजक सचिन साठे, पुणे मनपाच्या माजी नगरसेविका मोनिका मुरलीधर मोहोळ, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना शत्रुघ्न काटे, भुलेश्वर नांदगुडे, विनायक गायकवाड, निवृत्त एसीपी श्रीकांत पाटील, नरेंद्र गायकवाड, काळुशेठ नांदगुडे, नितीन इंगवले, सुरेश बापू साठे, अनंत कुंभार, अनिल संचेती, अशोक बालवडकर, कल्पनाताई सदाकाळ, अरुणा सूर्यवंशी, टीव्ही स्टार सह्याद्री मळेगांवकर आदींसह शेकडो सहभागी महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात प्रथम क्रमांक विजेत्या पुष्पा लोकरे यांना मानाच्या पैठणी सह रोख १,११,१११/- रुपयांचे बक्षीस देण्यात आले. द्वितीय क्रमांक विजेत्या सुनिता सत्यनारायण क्षीरसागर यांना रुपये ५१,१११/- रोख व मानाची पैठणी, तृतीय क्रमांक विजेत्या निकिता ऋषिकेश माने यांना रुपये ३१,१११/- रोख व मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच अमृता संदीप हळदणकर, गजराबाई मुरलीधर काटे, किरण अरुण पाटील, सोनाली आशुतोष देसले आणि अमृता रामेश्वर दहे या लकी ड्रॉ विजेत्यांना प्रत्येकी ११,१११/- रोख व आकर्षक साडी देऊन गौरविण्यात आले. तसेच उपस्थित प्रत्येक महिला भगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक साडी भेट देण्यात आली. क्रांतीनाना मळेगांवकर यांनी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. सचिन साठे सोशल फाऊंडेशन च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button