Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

रक्षाबंधन विशेष : जाणून घ्या राखी बांधतांना कोणत्या दिशेला असावे भावांचे तोंड व कशी बांधावी भावाला राखी?

रक्षाबंधन विशेष : राखी पोर्णिमा म्हणजे ‘रक्षाबंधन’. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस असतो. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते. बहिण जेव्हा भावाल राखी बांधते त्यावेळी परंपरेनुसार औक्षण केले जाते. औक्षण करताना भावाने कुठल्या दिशेला तोंड करून बसावे. किंवा राखी बांधतांना कोणत्या हातात राखी बांधावी जाणून घेऊयात…

राखी बांधतांना कोणत्या दिशेला भावांचे तोंड असावे?

राखी बांधताना भावाचे तोंड कोणत्या दिशेला आहे याला देखील खूप महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार राखी बांधताना भावाचे तोंड पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते. त्यामुळे यंदा राखी बांधताना भावाला पुर्वेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीने पश्चिमेकडे तोंड करून बसून भावाला राखी बांधावी आणि त्याचे औक्षण करावे.

हेही वाचा – Pimpri-Chinchwad : चिखलीमधील दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. हा सण बहीण भावाचं नातं अधोरेखित करतं. अतूट नातं आणि उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा हा दिवस आहे. या सणाचं औचित्य साधत बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी पार्थना करते. पण राखी बांधण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राखी बांधताना मनगटावर किती गाठ बांधली पाहिजे याचा विचार केला आहे का? काहींना त्याबद्दल माहिती असेल, काहींना नाही. चला तर मग जाणून घेऊयात.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधताना धाग्याच्या तीन गाठी मारणे शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ स्वत:च्या दीर्घायुष्यासाठी, तिसरी गाठ भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते अशी देखील मान्यता आहे. या तीन गाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश या त्रिमुर्तीच्या प्रतिक असतात अशी धार्मिक मान्यता आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button