Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘भारत जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज’; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई : समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला पुढे नेऊन भारत आज जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर (नेस्को) येथे आयोजित इंडिया मेरीटाईम वीक २०२५ अंतर्गत ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये  २ लाख २० हजार कोटींच्या ट्रान्सफॉर्मेटिव इनिशिएटिव फॉर शिपिंग अँड शिपबिल्डिंगचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वा सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग, बंदरे राज्यमंत्री शांतनू ठाकूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बंदरे मंत्री नितेश राणे आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा –  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत VVPAT वापराची कायद्यांत तरतूद नाही; आयोगाने स्पष्टच सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, २०१६ मध्ये मुंबईत भारतीय सागरी सप्ताहाची सुरुवात झाली होती. आज हा ग्लोबल इव्हेंट झाला आहे, ही आनंदाची बाब आहे. यात आघाडीच्या कंपन्यांच्या प्रमुखांपासून स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदार उपस्थित आहेत. जगातील ८५ हून अधिक देशांची भागीदारी असल्याने आणि येथे १२ लाख कोटी रुपयांहून अधिकचे सामंजस्य करार झाल्याने भारतीय सामर्थ्यावर जगाचा विश्वास दृढ होत असल्याचे दिसून येत आहे. २१ व्या शतकात भारताचे सागरी क्षेत्र वेगाने प्रगती करीत असून २०२५ हे वर्ष भारताच्या सागरी क्षेत्रासाठी महत्त्वाचे वर्ष ठरले आहे. मागील दहा वर्षात भारतीय सागरी क्षेत्रामध्ये ऐतिहासिक परिवर्तन झाले आहे. भारताची बंदरे विकसित राष्ट्रांच्या काही बंदरांपेक्षाही उत्कृष्ट झाली आहेत. भारतीय बंदराची वाहतूक क्षमता दुप्पटीने वाढली आहे. जेएनपीटी बंदर आता देशातील सर्वात मोठे बंदर झाले असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले.

भारताचे लक्ष ब्ल्यू इकॉनॉमीच्या विकासाकडे असून जहाजबांधणी क्षेत्रात भारत अग्रेसर ठरला असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले. भारताने आता मोठ्या जहाज बांधणीला पायाभूत सुविधा विकासाचा दर्जा दिला आहे. याला गती देण्यासाठी ७०  हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून लाखो रोजगार निर्मिती होईल, असेही ते म्हणाले. वाढवण येथे ७६  हजार कोटी रुपये गुंतवणूक करून बंदर विकसित केले जात आहे. देशातील बंदरांची क्षमता चौपट वाढविण्यावर भर दिला जात आहे. बंदर विकास आणि जहाजबांधणी क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीचे स्वागत करण्यात येत असून यासाठी राज्यांनाही प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यांना देखील सागरी क्षेत्राचा विस्तार करण्याची ही योग्य वेळ असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले. सागरी क्षेत्राच्या विकासामध्ये जगभरातील देशांचा वाढता प्रतिसाद पाहून शांतता, प्रगती आणि समृद्धीला आपण सर्वजण मिळून पुढे नेऊ या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button