‘मी सुपरवायझर सारखे लक्ष देईल, मात्र…..’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Modi-18-780x470.jpg)
नागपूर : नागपूर विमानतळाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यामुळे तीन ते साडेतीन वर्ष हे काम प्रलंबित राहिले. मात्र आता याच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यातून साधारणता नऊ लाख टन कार्गो निर्यात होईल. परिणामी राज्याच्या विकासात याचा मोठा फायदा होईल. ताडोबा जंगल सफारीसाठी दुरून दुरून लोक नागपुरात, विदर्भात येतात. त्यामुळे या विकासकामाला वेगळे महत्व आहे. यासाठी 8 ते 10 चांगले आर्किटेक निवडा. त्यांचे प्रेझेंटेशन घ्या आणि त्यातून एक डिझाईन सिलेक्ट करा. असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय. नागपूर विमानतळाच्या दुसऱ्या कार्गो धावपट्टीचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्चुअल भुमिपुजन पार पडले यावेळी नितीन गडकरी बोलत होते.
नागपुरातील नवीन एअरपोर्टच्या पहिल्या विमानासाठी बायो इंधन तयार करून आम्ही याच विमानासाठी देऊ, असे आमचे प्रयत्न आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर हे हवाई जहाज उडेल, असे आमचे प्रयत्न आहे. हे ग्रीन एअरपोर्ट बनावे असेही आमचे प्रयत्न आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्या प्रमाणे मी रोज या कामावर सुपरवायझर सारखा लक्ष देईल, जे काम चांगलं होणार नाही ते तोडायला देखील लावेल. असा मिश्किल टोला ही मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी लगावला आहे.
हेही वाचा – वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
किती लोकांना ब्लॅक लिस्ट केलं, किती लोकांना सस्पेंड केलं, किती लोकांना स्वेच्छानिवृत्ती घ्यायला लावली, जे काम करत नाही, त्याची सुट्टी करतो आणि याचा मी आठवड्याला अध्ययन करतो. तुम्ही नक्कीच चांगलं काम कराल आणि त्यातून एक चांगलं विमानतळ तयार होईल. असेही गडकरी यावेळी बोलतांना म्हणालेत. अजनी रेल्वे स्टेशनच काम गतीने सुरू आहे. रायफोड येथे सुरू झाल्यामुळे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट इथून करता येत आहे. यातून 68 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. आजही विमानतळाचा विस्तार होतं आहे. एम्स,आयएम, सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी नागपुरात आली आहे. त्यामुळे नागपूर एअरपोर्ट हे विदर्भासाठी ग्रोथ इंजन म्हणून उदयास येईल, असा विश्वास ही मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.