Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सांगवी आणि बोपोडीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाचे काम पूर्णत्वाकडे

पुणे : सांगवी व बोपोडी या दोन्ही भागांना जोडणाऱ्या मूळा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम हे पुणे महापालिकाव पिंपरी-चिंचवड महापालिका यांचे संयुक्त विद्यमाने अंतिम टप्प्यात आले आहे. संयुक्त प्रयत्नातून राबविलेल्या या प्रकल्पाचा उद्देश महत्त्वाच्या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्याचा असून लवकरच हा पुल नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

पुल बांधणीसाठी येणारा खर्च हा पुणे महापालिका व पिंपरी -चिंचवड महापालिका दोन्ही महापालिका मिळून 50-50% असा विभागून करणार आहेत. पुलाचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रगतीपथावर असून कामाची मुळ मुदत 24 महिने इतकी होती. परंतु, कामातील राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र राहुरी यांची काही भागातील जागा मिळण्यास विलंब झाल्याने या कामास 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पुलाच्या कामाची स्विकृत निविदा र.रु. 32.36 कोटी इतकी असून कामाच्या व्याप्तीमध्ये मुळा नदीवरील एकूण 125 मीटर लांबीचा पूल प्रस्तावित आहे. तसेच यामध्ये एकुण 25 मीटर लांबीच्या 5 गाळ्यांचा समावेश आहे. 18 मीटर रुंदी असलेल्या या पुलाच्या दोन्ही बाजूस पादचारी मार्गाची सोय उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा –  आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर साठी ज्यादा रेल्वे गाड्यांची सोय, पुणे विभागाची घोषणा

पुणे शहराच्या बाजूकडील पोहोचरस्ता हा 540 मीटर तर पिंपरी-चिंचवड बाजुकडील पोहोचरस्ता हा 95 मीटर लांबीचा आहे. 760 मीटर लांबी असलेल्या या पुलामुळे सांगवी बोपोडी हे अंतर कमी वेळेत पार करता येणार असून यामुळे ब्रेमेन चौक, औंध रावेत रस्ता, खडकी रस्त्यावरील रहदारी कमी होण्यास तसेच वाहतुक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. सद्यस्थितीत पुलाचे काम 90% पूर्ण झाले आहे. लवकरच हा पुल नागरिकांसाठी खुला करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे, अशी माहिती मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button