ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

हर्षवर्धन पाटील यांचा शरचंद्र पवार पक्षात प्रवेश निश्चित

पक्ष प्रवेशामुळे शरद पवार गटातील इंदापूरातील काही प्रमुख पदाधिकारी नाराज

पुणे : विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राजकीय पक्षांमध्ये हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. काही नेते नवीन पक्षाच्या शोधात आहे तर काही पक्ष प्रस्थापितांना आपल्या जाळ्यात लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे बडे नेते हर्षवर्धन पाटील पक्ष सोडणार आहे. ते भाजपचे कमळ सोडून तुतारी हाती घेणार आहे. त्यासाठी त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची सिल्व्हर ओकला भेट घेतली. त्यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. परंतु हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाला राष्ट्रवादीमधून विरोध होत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या होणाऱ्या पक्ष प्रवेशामुळे शरद पवार गटातील इंदापूरातील काही प्रमुख पदाधिकारी नाराज आहेत.

सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांभाळली कमान
लोकसभा निवडणुकीदरम्यान सुप्रिया सुळे यांची प्रचाराची मोहीम प्रवीण माने यांनी सांभाळली होती. त्यावेळी शरद पवार यांच्याकडून त्यांना इंदापूरमधून विधानसभेचे तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. परंतु आता हर्षवर्धन पाटील भाजपसोडून राष्ट्रवादीत येत आहे. त्यांना इंदापूरचे तिकीट देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवीण माने नाराज झाले आहेत. आपली नाराजी थेट सुप्रिया सुळे यांच्यापुढे ते मांडणार आहे. त्यामुळे ते सुप्रिया सुळे यांची भेट घेणार आहे. यामुळे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशामुळे शरद पवार गटातील दुफळी समोर आली आहे.

प्रवीण माने यांचे लागले होते बॅनर
हर्षवर्धन पाटील यांचा शरचंद्र पवार पक्षात प्रवेश निश्चित आहे. काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून शरद पवार यांच्या यांच्या राष्ट्रवादीत प्रवीण माने आले होते. त्यानंतर त्यांचा उल्लेख भावी आमदार असा इंदापूरमध्ये झाला होता. त्यांच्या सोनाली उद्योग समूहासमोर तसे बॅनर लागले होते. प्रवीण माने हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस हा शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत. हर्षवर्धन पाटील यांचा शरचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार असल्याने प्रवीण माने देखील इच्छुक आहेत. त्यामुळे साहजिकच येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाला तिकीट मिळेल हे देखील पाहणे तितकच महत्त्वाचा ठरणार आहे.

फडणवीस यांच्याकडून रोखण्याचा प्रयत्न
प्रवीण माने अजित पवार यांचा पक्ष सोडत असताना त्यांना रोखण्याचा प्रयत्न भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही केला होता. देवेंद्र फडणवीस स्वत: प्रवीण माने यांच्या घरी पोहचले होते. त्यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रविण माने यांनी ऐकले नाही. प्रवीण माने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अन् सोनाई उद्योग समूहाचे संचालक आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button