‘शरद पवार यांचा जनाधर कमी झाला की लोकशाही धोक्यात..’; भाजपा नेत्याची टीका
राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून शरद पवार हे एकटेच अध्यक्ष आहेत
मुंबई : भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहलेल्या पत्रासंदर्भात बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, शरद पवार यांचा जनाधार कमी झाला की, लोकशाही धोक्यात येते, हेच यांचे जुने भांडवल आहे. राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून शरद पवार हे एकटेच अध्यक्ष आहेत आणि आता हे सांगतात लोकशाही धोक्यात येत आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांचा जनाधर कमी झाला की, लोकशाही धोक्यात ये हेच यांचे जुने भांडवल असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
शरद पवार २४ वर्षानतर देहूला गेले आहेत आणि तेही तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मग २४ वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांची समाधी नव्हती का? तुकाराम महाराज नव्हते का, असा टोला शरद पवार यांना गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.
राज्य सरकारचे कौतूक करताना गोपीचंद पडळकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचे कौतूक केले. राज्यातील हे सरकार चांगले काम करत आहे. विरोधकांवर कोणत्याही कुरघोड्या न करता हे सरकार काम करत असल्याचे गौरवोद्गगारही गोपीचंद पडळकर यांनी काढले आहेत.