‘गुरूकुलम्’मध्ये शिकणाऱ्या भटके, विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना मा.नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्यावतीने ‘फळे व खाऊ वाटप’
देशाचे ग्रामविकास मंत्री लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडेसाहेबांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त स्तुत्य उपक्रम
पिंपरी-चिंचवडः भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व देशाचे ग्रामविकास मंत्री लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडेसाहेबांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचलित ‘गुरूकुलम्’ मध्ये शिक्षण घेणाऱ्या भटके, विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टीचे मा.नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांच्यावतीने ‘फळे व खाऊ वाटप’ उपक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमप्रसंगी चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीशजी प्रभुणे व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष प्रा.सदाशिव खाडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष रविंद्र देशपांडे, भाजपा सचिव मधुकरजी बच्चे, भाजयुमोचे प्रदेश सचिव अजितजी कुलथे, भटके-विमुक्त आघाडीचे शहराध्यक्ष गणेश ढाकणे, जेष्ठ कार्यकर्ते पाटीलबुवा चिंचवडे, रविंद्रजी प्रभुणे, तुकारामजी चौधरी, नंदूकाका भोगले, प्रदिपजी सायकर, कैलासजी सानप, प्रशांतजी आगज्ञान, सुभाषकाका मालुसरे, धनंजय शाळिग्राम, मुकुंदराव गुरव, गजाननकाका बावळे, आनंदजी कुलकर्णी, पल्लवीताई पाठक, ताई कलापुरे, मिथुनजी बोरगांव, अतुल कांबळे यांसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.





