Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर! ‘Article 370’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

72nd National Film Awards | भारतीय मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (72nd National Film Awards) आज नवी दिल्ली येथे अधिकृत घोषणा करण्यात आली. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत सेन्सॉर झालेल्या आणि प्रदर्शित झालेल्या उत्कृष्ट चित्रपटांचा, कलाकारांचा तसेच तंत्रज्ञांचा सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे.

यंदाच्या पुरस्कारांवर ‘Article 370’ या चित्रपटाने आपले वर्चस्व सिद्ध केले असून, त्याला देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा (Best Feature Film) बहुमान मिळाला आहे. तर मराठी विभागात ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे.

यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (Best Actor) पुरस्कार संयुक्तपणे जाहीर झाला आहे. बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन याला ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी, तर दाक्षिणात्य सुपरस्टार मामूटी याला ‘ब्रह्मयुगम’ या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले आहे. तसेच ‘Article 370’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री यामी गौतम हिला या वर्षाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best Actress) म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मराठी सिनेसृष्टीसाठी यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा खास ठरला. व्यावसायिक चित्रपटांमध्ये ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. तर नॉन-फीचर (लघुपट) श्रेणीत ‘हमसफर’ या मराठी लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा (३० मिनिटांपर्यंत) पुरस्कार जाहीर झाला आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन अभिजीत अरविंद दळवी यांनी केले आहे. याशिवाय ‘घरत गणपती’ चित्रपटातील ‘नवसाची गौराई माझी’ या गाण्यासाठी अभय जोधपूरकर याला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा (Best Male Playback Singer) पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा

होर्मुजमधून भारतीय जहाजांची वाहतूकच जास्त… इराणकडे परवाना अर्ज करण्यात भारत आघाडीवर

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची प्रमुख विजेतेपद यादी:

सर्वोत्कृष्ट चित्रपट ( Best Feature Film ) : Article 370

सर्वोत्कृष्ट अभिनेता : कार्तिक आर्यन ( चंदू चॅम्पियन ), मामूटी ( ब्रह्मयुगम )

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : यामी गौतम ( आर्टिकल ३७० )

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : राजकुमार पेरियासामी ( अमरन )

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : रोपश्री वरकाडी ( मिथ्या ) आणि सचन नमिदास ( महाराजा )

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: संजय मिश्रा ( भक्षक )

सर्वोत्कृष्ट चित्रपट Providing Wholesome Entertainment : Kalki 2898 AD

राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट : कॅप्टन मिलर

सर्वोत्कृष्ट बालकलाकार : रिद्धिमान बॅनर्जी, तपोमय देब आणि गीताश्री चक्रवर्ती

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : ब्रह्मयुगम (शेहनाद जलाल)

सर्वोत्कृष्ट पटकथा: पुष्पा २ (सुकुमार)

सर्वोत्कृष्ट संवाद लेखक: लकी भास्कर ( संवाद लेखक : वेंकी अटलुरी)

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: Kalki 2898 AD

Best Action Direction : अनल अरासू, महाराजा

सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट: कमिटी कुर्रोलू

सर्वोत्कृष्ट वेशभूषा : पुष्पा २- दीपाली नूर आणि शीतल शर्मा

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: आर्टिकल ३७०, शाश्वत सचदेव

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत: जी.व्ही.प्रकाश, अमरन

सर्वोत्कृष्ट गीत: मनोज मुंतशीर, मैदान

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: अभय जोधपूरकर, घरत गणपती ( नवसाची गौराई माझी )

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: वैकोम विजयालक्ष्मी

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: विजय गांगुली, स्त्री 2

सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन : मानस चौधरी, भूल भुलैया ३

सर्वोत्कृष्ट संपादन ( Editing ): आर कलैवन्नन, अमरन

सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट: जुईफूल

सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट: चलचित्र एकोन

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: श्रीकांत

सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – मिथ्या

सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट: Feminichi Fathima

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी

सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट: लहरी

सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट: रायन

सर्वोत्कृष्ट गढवाली चित्रपट: ढोली

सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट: कमिटी कुर्रोलू

सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – मारन

सर्वोत्कृष्ट मणिपुरी चित्रपट – सुनीता

विशेष उल्लेख – ‘कॅप्टन मिलर’साठी धनुष आणि ‘मियाझगन’साठी सुरेन जी

Non-feature categories

Best Film Critics – संजीव श्रीवास्तव (हिंदी)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आनंद एल राय – स्टॅच्यू ऑफ युनिटी – एकता का प्रतीक (हिंदी)

सर्वोत्कृष्ट लघुपट (३० मिनिटांपर्यंत) – हमसफर (मराठी) – निर्माते : अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट्स; दिग्दर्शक : अभिजीत अरविंद दळवी

सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारी सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म – Piplantri : अ टेल ऑफ इको फेमिनिझम (हिंदी, राजस्थानी आणि इंग्रजी) – निर्माते: जॉन्सन्स सूरज फिल्म्स इंटरनॅशनल; दिग्दर्शक : सूरज कुमार

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button