किशोर आवारे हत्या प्रकरण, माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक
![Former councilor's son arrested in Kishore Aware murder case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/kishor-aware-780x470.jpg)
पुणे : पुण्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली आहे. किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याला पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली आहे. या हत्येचा तो मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आलं आहे.
हत्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी ही कबुली दिली आहे. काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचाच राग मनात ठेवून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं.
हेही पाहा – ‘मोफत तिकीट दिलं नाही, नाटक कसं होतं बघतो’; अमोल कोल्हेंचा पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांकडून देण्यात आली आहे.