अयोध्येत अवतरलं भगवं वादळ! एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांची मेगा रॅली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अयोध्येत शक्तिप्रदर्शन

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. ठिकठिकाणी त्यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. दोन्ही नेते हेलिकॉप्टरने अयोध्येत आले. त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अयोध्येत मेगा रॅली निघाली. या रोड शोला प्रचंड गर्दी होती. स्थानिक लोकही या दोन्ही नेत्यांना पाहण्यासाठी एकवटले होते. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात होत्या. तसेच अयोध्येत नाक्या नाक्यावर भगवे झेंडे लावण्यात आले होते. तसेच पोस्टर्स आणि बॅनरवाजी करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवमय झालं होतं.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्येत जाणार असल्याने या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.





