गिरीश महाजन यांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध; एकनाथ खडसेंचा सनसनाटी आरोप

मुंबई | भाजपाचे ‘संकटमोचक’ अशी ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. या आरोपांसंदर्भात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार आहेत. एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ प्रसिद्ध करून गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले.
एकनाथ खडसे म्हणाले, की गिरिश महाराजांनाच्या रंगल्या रात्री अशा विषयाखाली एका पत्रकाराने एक क्लिप प्रकाशित केली आहे. त्यात संबंधित पत्रकाराने सांगितलंय की गिरीश महाजानांचे महिला आयएएस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहेत. त्यांचं नाव मला माहितेय पण ते सांगणं उचित होणार नाही.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या बैठकीवेळी अमित शाहांनी गिरीश महाजनांना या संबंधित महिला आयएएस अधिकाऱ्याविषयी विचारलं होतं. तेव्हा गिरीश महाजन म्हणाले होते की कामाच्या निमित्ताने माझे अनेकांबरोबर संबंध आहेत. अमित शाहांनी तेव्हा सांगितलं की तुमचे (गिरीश महाजन यांचे) कॉल डिटेल्स माझ्याकडे आहेत. १०० वेळा त्या महिला आयएएस अधिकाऱ्याबरोबर तुझे कॉल झालेले आहेत. पुढे काहीही सांग, तुझा सीडीआर खरं बोलतो. अमित शाहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन संबंधित पत्रकाराने काही प्रश्न उपस्थित केले आहेत, असं एकनाथ खडसे म्हणाले.
हेही वाचा : BJP Foundation Day | स्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपाचे जोरदार शक्तीप्रदर्शन!
मला वाटतं, (अमित शाहांकडे असलेले) सीडीआर तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री, असं पत्रकाराने म्हटलंय. मीही अमित शाहांची भेट झाली तर यातील तथ्य किती आहे हे विचारणार आहे.
गिरीश महाजानांचे हे संबंध अवघ्या राज्याला माहीत आहे. हे आजचं नाही. गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रात ही चर्चा सुरू आहे. या अधिकाऱ्याचे नावही सर्वांना श्रूत आहे. आयएएस अधिकाऱ्यांना मंत्री फोन करत असतील आणि त्यात जर तथ्य असेल तर त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार काय? नैतिकता आहे की नाही? बायकांना रात्री फोन करणे योग्य आहे का. सर्वांना हे प्रकरण माहितेय, असंही एकनाथ खडसे म्हणाले.