Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रात सुलभ व विश्वासार्ह व्यवस्था’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगसमूहांसाठी राज्य शासनाने सुलभ आणि विश्वासार्ह व्यवस्था निर्माण केली असून गुंतवणुकदारांचा अनुभव पूर्णपणे अडथळामुक्त राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या उपस्थितीत विधानभवन, मुंबई येथे उद्योग विभागाच्या वतीने आठ कंपन्यांसोबत सामंजस्य करार  करण्यात आले. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अन्बळगण, उद्योग सहसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार तसेच आठ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या करारांमुळे राज्यात सुमारे 44,710 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 7,030 रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने गुंतवणूकदारांसाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभी केली आहे. शासन आणि उद्योगक्षेत्र एकत्रितपणे प्रगती करू शकतो, असा महाराष्ट्राचा सिद्ध झालेला अनुभव आहे. त्यामुळे प्रशासकीय बाबींमध्ये काही अडचण आल्यास शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल. उद्योगांना आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या वेळेत मिळाव्यात यासाठीही शासन प्रयत्नशील राहील.

हेही वाचा –  ‘आगामी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

आज झालेल्या या करारांनुसार विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक होणार असून त्यामध्ये एरोस्पेस, डेटा सेंटर, स्टील, ग्रीन इनिशिएटिव्ह, हायड्रोजन व नैसर्गिक वायू साठवण प्रणाली, फायबर उत्पादन अशा आधुनिक आणि महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे या सामंजस्य करारांमध्ये रेटाविया प्रा. लि. (नांदेड) यांचा हेलिप्लांट प्रकल्प (4,250 कोटी), एसीई गॅसेस टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (दिंडोरी, नाशिक) यांचा एसीई गॅसेस, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (750 कोटी), टाटा टेक्नॉलॉजीज लि. (नागपूर, पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर) यांचा एरोस्पेस व संरक्षणसंबंधित साहित्य (4,800 कोटी), जेके इन्फोटेक (हिंजवडी, पुणे) यांचा डेटा सेंटर ग्रीन इनिशिएटिव्ह (1,000 कोटी), एस.एम. स्टील्स अँड पॉवर लि. (सलोरी, चंद्रपूर) यांचा इंटिग्रेटेड स्टील व स्पेशल स्टील कॉम्प्लेक्स (20,000 कोटी), कोनार्क सॉफ्टकोर सोल्यूशन्स प्रा. लि. (हिंजवडी, पुणे) यांचा डेटा सेंटर (1,600 कोटी), ॲडव्हांटेक फ्युएल सिस्टीम प्रा. लि. (सुपा-पारनेर एमआयडीसी, अहिल्यानगर) या हायड्रोजन व नैसर्गिक वायू साठवण प्रणाली (400 कोटी) आणि इन्फिनिटीटेड फायबर कंपनी   (पीएम मित्रा पार्क, अमरावती) यांचा सर्क्युलर फायबर सेंटर (11,910 कोटी) यांचा समावेश आहे.

या प्रकल्पांमुळे नांदेड, नाशिक, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अमरावती या भागांमध्ये औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच राज्यातील या नव्या गुंतवणुकीमुळे स्टील, माहिती तंत्रज्ञान, अवकाश व संरक्षण साहित्य, वस्त्रोद्योग आणि हरित ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांत विकासाला चालना मिळणार असून, राज्यातील औद्योगिक वाढीसह मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्यास मदत होणार आहे..

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button