Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

कोणी स्वतःला बाहुबली समजू नका, अनेकांना आम्ही निवडून आणलंय; प्रफुल्ल पटेल यांचा रोख नेमका कुणाकडे?

Bhandara News : निवडणुकीत मतदान घेण्यासाठी कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी नियोजन करावं. लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. मेहनत करा, घरी बसून कोणी वोट करणार नाही. यासाठी वातावरण निर्मिती सुद्धा करावी लागेल. कोणी स्वतःला बाहुबली समजत असेल तर, आम्ही अशा अनेक बाहुबलींना निवडून आणलेलं आहे. निवडणुकीसाठी पैसे लागतात. आपण महायुतीत असलो तरी, राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पैशाच्या पुढे कुणी म्हणत असेल की मी निवडून आलोच तर असं होत नाही. आपण सक्षम आहोत, इतरांना आपली चिंता करावी लागेल. समझनेवाले को इशारा काफी है! असा इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिला.

भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता, पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रफुल पटेल यांचा हा रोख नेमका कुणाकडे होता? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

हेही वाचा –  दिल्ली स्फोटात नवा खुलासा ; घटनास्थळावरून तीन काडतुसे जप्त

आपण सक्षम आहोत. इतरांची चिंता करण्यापेक्षा इतरांना आपली चिंता करावी लागेल. कोणी बाहुबली आहे, असं समजू नका. त्यामुळं ते निवडून येणार आहे, असं समजू नका. किती बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे. निवडणुकीसाठी पैसे लागतात. मात्र, पैशाच्या पुढं कुणी म्हणत असेल की, मी निवडूनच आलो तर, असं होत नाही. जितके पैसे लागतात ते खर्च करावेच लागतात आणि ते होणारच आहे. फक्त पैशाच्या आधारावर कोणी निवडून येत नाही. लोक पैसे घेतात आणि त्यांना जिथे वोट मारायचं असेल तिथेच मारतात. असेही प्रफुल्ल पटेल (Praful Patel) म्हणाले.  समझनेवाले को इशारा काफी है! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक वेगळी ओळख आहे. आपण महायुतीत आहोत. पण आपण आपली वेगळी ओळख कायम ठेवलेली आहे. असेही ते म्हणाले.

शिव, शाहू, फुले, आंबेडकरांना मानणारा आपला पक्ष आहे. आपण सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे जेव्हा मतदार नाव आणि चिन्ह बघेल तर ते आपल्याकडे ओढले जातील. त्यासाठी आपल्याला नियोजन चांगलं करायचं आहे. मेहनत करा. घरी बसून कोणी आपल्याला वोट करणार नाही. काम तर करावचं लागणार आहे. घरा-घरापर्यंत जावं लागणार आहे. यासाठी वातावरण निर्मिती सुद्धा करावी लागणार आहे. असे आवाहन देखील प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी केलंय.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button