Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘डिजिटल इंडिया’मुळे भारताची नवी ओळख!

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या उपक्रमास बुधवारी ११ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारची प्रशंसा करत या उपक्रमाने प्रशासनाची व्याख्या नव्याने लिहिली आहे, नागरिकांना सक्षम केले आहे आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करून सर्वसमावेशक विकासाचा वेग वाढवला आहे, असा विश्वास व्यक्त केला.

‘‘डिजिटल इंडिया उपक्रम सुरू करून ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज आपण आनंद साजरा करत आहोत. या उपक्रमाने प्रशासनाची नव्याने व्याख्या केली आहे, नागरिकांना सशक्त केले आहे आणि चौफेर विकासाला गती दिली आहे, ” असे मोदी यांनी ‘एक्स’वर नमूद केले आहे.

हेही वाचा –  सोनोग्राफी आणि IVF केंद्रांच्या मनमानीला चाप! गैरप्रकार करणाऱ्यांवर आता ‘मकोका’अंतर्गत कारवाई; आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

‘डिजिटल देयक आणि थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकतेने मदत पोहोचवण्यापासून ते डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विस्तारापर्यंत, तंत्रज्ञान हे राहणीमान सुलभ करण्याचे एक शक्तिशाली साधन बनले आहे, ” असे पंतप्रधान म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button