‘अजित पवार कधीही मुख्यमंत्री होऊ शकतात’; धर्मरावबाबा आत्राम यांचं मोठं विधान

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर त्यांना पाच वर्षासाठी मुख्यमंत्री करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी मोठं विधान केलं आहे.
धर्मरावबाबा अत्राम म्हणाले, पाच वर्षाकरता होईल की आणखी काय होईल हे माहीत नाही. पण अजितदादा मुख्यमंत्री होणार आहेत. लवकरच मुख्यमंत्री होतील. अजितदादा पुढच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होणार आहे काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर तसं काही नाही. केव्हाही होतील. राजकारण काही सांगून येत नाही. राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही.
हेही वाचा – ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा लंडनमध्ये उभारणार’; सुधीर मुनगंटीवार
अजितदादा मुख्यमंत्री बनू शकतात हाच फडणवीस यांच्या विधानाचा अर्थ आहे. पुढच्या निवडणुकीनंतर किंवा त्यापूर्वीही दादा मुख्यमंत्री होऊ शकतात. दादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असं धर्मरावबाबा अत्राम म्हणाले.
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून अजितदादा यांच्या नाराजीचा प्रश्नच नव्हता. पुण्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला द्यायचं हे आधीच ठरलं होतं. फक्त ते देण्यासाठी थोडा उशीर झाला. तर पुण्याचं पालकमंत्रीपद गेल्याने चंद्रकांत पाटील नाराज नाहीत, असंही धर्मरावबाबा अत्राम म्हणाले.





