ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘धर्मवीर 2’ला ओटीटीवर एका आठवड्यात 50 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज

धर्मवीरचा सीक्वेल तयार करण्याची संधी मिळणं हा समृद्ध करणारा प्रवास

मुंबई : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. झी5 या ओटीटीवर एका आठवड्यात सर्वाधिक व्ह्यूज या चित्रपटाने मिळवले आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसपाठोपाठ ओटीटीवरही साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट गाजत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाची निर्मिती साहील मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओज या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी सांभाळली आहे. प्रसाद ओक, क्षितीश दाते, स्नेहल तरडे, देवेंद्र गायकवाड, समीर धर्माधिकारी, हृषिकेश जोशी, आनंद इंगळे, कमलेश सातपुते, मंगेश देसाई अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाँच करण्यात आला.

झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘धर्मवीर 2’ला एकाच आठवड्यात 50 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यापूर्वी वाळवी या चित्रपटाला एका आठवड्यात 14 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. त्यामुळे ‘धर्मवीर 2’ चित्रपटाने ‘वाळवी’लाही मागे टाकून नवा विक्रम नोंदवला आहे. ‘धर्मवीर 2’ची गोष्ट पहिल्या भागाच्या शेवटापासून पुढे सुरू होते. त्यामध्ये कोणत्या प्रमुख घटकांमुळे एकनाथ शिंदे 2022 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले होते ते दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटात राजकीय निष्ठा आणि महत्त्वाकांक्षेची आव्हानं, दिघे यांचे वारसदार या नात्याने शिंदे यांचा प्रवास आणि राजकीय पटलावरील आव्हानांतून मार्ग काढताना आलेली आव्हानं पाहायला मिळतं.

धर्मवीरचा सीक्वेल तयार करण्याची संधी मिळणं हा समृद्ध करणारा प्रवास होता. चरित्रपट तयार करणं हे एक सुंदर आव्हान असतं आणि मी तो करताना आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तीमत्त्वांशी खऱ्या अर्थाने प्रामाणिक राहात खिळवून ठेवणारी गोष्ट सांगण्याचं ध्येय ठेवलं होतं. प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम खऱ्या अर्थाने समाधान देणारं आहे. प्रसाद ओक आणि क्षितिश दाते यांनी केलेली मेहनत, त्यांचा ध्यास आणि अभिनय कौतुकास्पद आहे. या चित्रपटाने इतिहास घडवला,अशी भावना दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी व्यक्त केली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button