breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू’; देवेंद्र फडणवीस यांचा सूचक विधान

मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील काही आमदार शिंदे-फणडवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द भाजपाने दिला असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याबाबत मोठं वक्तव्य त्यांनी केलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहिली बाब म्हणजे सहा महिन्यांत कोणत्याही गोष्टी बदलत नाहीत. अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचं असेल, तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू. जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू.

हेही वाचा – दिवाळीआधी जनतेला मोदी सरकारचं मोठं गिफ्ट; आता ६०० रूपयांमध्ये मिळणार LPG सिलिंडर 

आता मी तुम्हाला स्पष्टपणे एवढंच सांगू इच्छितो की, सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. तेच मुख्यमंत्री राहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा – विधानसभा निवडणुका लढवल्या जातील. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार आहे, हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार नाहीत म्हणजे बदलणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button