ताज्या घडामोडीराजकारण

आज दिल्लीचा आखाडा कोण गाजवणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष

पोस्टल मतमोजणीत भाजपने आघाडी ,त्यापाठोपाठ आप,काँग्रेसचा जागांचा दुष्काळ संपलेला नाही.

दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपचं डबलसीट सरकार दाखल झाले. त्यानंतर आज दिल्लीचा आखाडा कोण गाजवणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. देशाच्या राजधानीत भाजपचे कमबॅक होणार, असा दावा एक्झिट पोलने केला आहे. तर आप सुद्धा मोठी मुसंडी मारण्याचा दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेसला निदान एक तरी जागा निवडून आणता येईल की नाही, हे आज स्पष्ट होईल. त्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वातील INDIA आघाडीत त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. सध्या पोस्टल मतमोजणीत भाजपने आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ आप आहे. तर काँग्रेसचा जागांचा दुष्काळ संपलेला नाही.

कल सांगतो काय?
सध्या पोस्टल मतमोजणी पूर्ण झाली आहे. लवकरच प्रत्यक्ष मतमोजणीला आता सुरुवात होईल. तर सुरुवातीच्या कौलमधील 42 जागांचे कल समोर आले आहेत. त्यात 15 जागांवर आप तर 26 जागांवर भाजप आघाडीवर आहेत. काँग्रेस एका जागेवर आघाडीवर दिसत आहे. कलामध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे अस्तित्व दिसत नाही. शीला दीक्षित यांच्यानंतर काँग्रेसचा दुष्काळ संपलेला नाही. त्यातच आपचे अनेक दिग्गज पिछाडीवर दिसत आहेत.

हेही वाचा  :  कर्जाचा EMI कमी होणार! RBI कडून रेपोदरात कपात 

सुरुवातीच्या कलामध्ये भाजपा बहुमतामध्ये भाजप केवळ 5 जागा दूर आहेत. दिल्लीत कमळ फुलताना दिसत आहे. भाजप 27 वर्षानंतर पुन्हा जोरदार कमबॅक करताना दिसत आहे. दिल्लीत भाजपचे कमळ फुलल्यास हा मैलाचा दगड ठरणार आहे. भाजपचा झंझावत थांबवण्यासाठी इंडिया आघाडी अपयशी ठरत असल्याचे यावरून दिसून येते. अरविंद केजरीवाल, आतिशी, मनिष सिसोदिया हे तिघे पण सध्या पिछाडीवर दिसत आहेत.

एक्झिट पोलचे मत कुणाच्या पारड्यात?
डीव्ही रिसर्च करून जारी करण्यात आलेल्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपच्या पारड्यात मतं टाकले आहे. दिल्लीमध्ये भाजपला 40 ते 44 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आपला 25 ते 29 जागेचा कौल देण्यात आला आहे. तर काँग्रेसचा जागांचा दुष्काळ संपताना दिसत नाही. या एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला केवळ एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

सर्व एक्झिट पोलने दिल्लीमध्ये भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे. आपला मोठा धक्का बसू शकतो. काँग्रेस विधानसभेत असेल की नाही, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. भाजप तब्बल 25 वर्षांनी पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button