‘तुझा लवकरच दाभोलकर हेणार..’, शरद पवारांना ट्विटवरून जीवे मारण्याची धमकी!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा – १००० रूपयांच्या नोटा पुन्हा चलनात येणार? RBI ने दिलं स्पष्टीकरण
एका सोशल मीडिया अकाऊंटवरून शरद पवार यांना ही धमकी देण्यात आली आहे. ‘शरद पवार तुझा लवकरच दाभेलकर हेणार..’ अशी पोस्ट अकाऊंटवर करण्यात आली आहे. तसेच, या धमकीबरोबरच शरद पवार यांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. यासंदर्भात गृहविभागानं लक्ष घालण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेली दिली आहे.
गृहमंत्रालयाने याची नोंद घ्यावी. मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना यासंदर्भात माहिती दिली आहे. शरद पवारांना ज्या पद्धतीने ही धमकी आली आहे. ते दुर्दैवी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. धमकी देणाऱ्या ट्वीटमध्ये शरद पवारांना शिवीगाळ करून पुढे ‘तुमचाही दाभोलकर होणार’ असा उल्लेख करण्यात आला आहे.





