काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी
![Congress leader Ashish Deshmukh expelled from the party](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Ashish-Deshmukh--780x470.jpg)
मुंबई : काँग्रेसचे नेते, माजी आमदार आशिष देशमुख यांना पक्ष शिस्त मोडल्याचा चांगलाच फटका बसला आहे. आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष शिस्त मोडल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी, नाना पटोले यांच्याविरोधातील आशिष देशमुख यांनी वारंवार विधाने केली होती. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रक जारी केलं असून त्यात आशिष देशमुख यांना निलंबित करण्यात आलं आहे. देशमुख यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
हेही वाचा – पोस्ट ऑफिसमध्ये २००० च्या नोटा बदलता येतील का?
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांनी पक्षशिस्त मोडल्याबद्दल ५ मार्च रोजी करणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर देशमुख यांनी ९ एप्रिल रोजी उत्तर दिलं होतं. देशमुख यांच्या या उत्तरावर शिस्त पालन समितीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.