पोस्ट ऑफिसमध्ये २००० च्या नोटा बदलता येतील का?

मुंबई : केंद्र सरकारने २००० रूपयांच्या नोटांविषयी मोठा निर्णय घेतला. यावर्षी सप्टेंबर महिन्यानंतर ही नोट चलनातून बाहेर होईल. या निर्णयाची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी १९ मे रोजी केली. २३ मे पासून २००० रूपयांच्या नोटा बदलविण्यात येत आहेत.
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला २००० रुपयांच्या नोटा बदलून घेता येतील का? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र पोस्ट ऑफिसमधून नोटा बदलून घेता येणार नाहीत. मात्र पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही २००० रुपयांच्या नोटा जमा करू शकता. त्यासाठी तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये KYC असणे बंधनकारक आहे.
हेही वाचा – नव्या संसद भवनात ठेवणार ऐतिहासिक सेंगोल, ‘सेंगोल’ म्हणजे काय?
२००० रुपयांच्या नोटा फक्त बँक व RBI च्या प्रादेशिक कार्यालयात बदलून मिळणार आहेत. २००० रुपयांच्या नोटा तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या खात्यात किंवा जमा करता येतील. तसेच पोस्ट ऑफिसमधील सेवांचा लाभ घेण्यासाठी अथवा स्टॅम्प वा इतर खरेदीसाठी या नोटांचा वापर करता येईल. तुम्ही रजिस्ट्री अथवा स्पीड पोस्टासाठी या नोटांचा वापर करू शकता. तसेच २००० रूपयांच्या नोटा येऊन तुम्ही मनीऑर्डर पण करू शकता.





