Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

मावळ लोकसभेत ईव्हीएम मशीनच्या मांडणीवरून गोंधळ; ठाकरे गटाच्या शहाराध्यक्षाला अटक

पिंपरी | पुणे जिल्ह्यातील शिरुर, मावळ, पुणे लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या मतदानावेळी अनेक ठिकाणी EVM मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याचं पाहायला मिळालं तर कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात तू तू मै मै पाहायला मिळालं. त्यातच मावळ लोकसभेत ईव्हीएम मशीनची मांडणी चुकीच्या पद्धतीने केली, असं म्हणत ठाकरे गटाच्या शहाराध्यक्षाने गोंधळ घालणं चांगलंच महागात पडलं आहे.

मावळ लोकसभेत ईव्हीएम मशीनची मांडणी चुकीच्या पद्धतीने केली, असं म्हणत ठाकरे गटाच्या शहाराध्यक्षाने गोंधळ घातला. या प्रकरणी सचिन भोसलेंना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करायला नेहले आहे. पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये ही घटना दुपारच्या सुमारास घडली. खिंवसरा शाळेतील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनची मांडणी चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप भोसलेंनी केला. बराच वेळ निवडणूक कर्मचाऱ्यांनी भोसलेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मतदान केंद्रावर गर्दी करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत होते. हे पाहता निवडणूक कर्मचाऱ्यांनी वाकड पोलिसांना पाचारण केलं. काही वेळातच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी निवडणूक कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर वाकड पोलिसांनी भोसलेंना अटक केलं आहे. सध्या त्यांना न्यायालयात हजर करायला नेले आहे.

हेही वाचा    –      अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने निगडीत बजाविला मतदानाचा हक्क!

दरम्यान, शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष असलेल्या मावळ लोकसभेमध्ये सुद्धा दुपारी एक वाजेपर्यंत पनवेल मतदारसंघांमध्ये 26.93 टक्के मतदानाची नोंद झाली. कर्जतमध्ये 29.47 टक्के मतदानाची नोंद झाली. उरणमध्ये 29.6 टक्के मतदानाची नोंद झाली. मावळमध्ये 28.3 टक्के मतदानाची नोंद झाली. चिंचवडमध्ये 26.12 टक्के मतदानाची नोंद झाली. पिंपरीमध्ये 23.96 टक्के मतदानाची नोंद झाली. तर मावळमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत पनवेल मतदारसंघांमध्ये 34.93, कर्जतमध्ये 38.3, उरणमध्ये 42.89, मावळमध्ये 37.5, चिंचवडमध्ये 35.8 तर पिंपरीमध्ये 33.74 मतदानाची नोंद झाली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button