आ. महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी येथे रंगणार ‘खेळ खेळू पैठणीचा’
जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे भाजपा चिटणीस कविताताई भोंगाळे यांचे आवाहन
![On the occasion of Maheshdada Landge's birthday, Bhosari, Rangnar, Khel Khulhu Paithani.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/KAVITATAI-BHONGALE-KADU-780x470.jpg)
भोसरी : आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा चिटणीस कविताताई भोंगाळे – कडू यांच्यावतीने खास महिलांसाठी गुरुवार दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता विदर्भ मित्र मंडळ भोसरी येथे क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत खेळ खेळू पैठणीचा या लोकप्रिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक कविताताई भोंगाळे-कडू यांनी दिली. स्पर्धेतील विजेत्या महिलांना एलईडी टीव्ही, ओव्हन, मिक्सर, गॅस शेगडी, पंखा, 11 भाग्यवान महिलांसाठी मानाच्या पैठणी साड्या व सहभागी प्रत्येक महिलेस एक आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे.
तसेच महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी दिघी परिसरातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना आमदार महेशदादा लांडगे, ज्येष्ठ मार्गदर्शक विनायकराव भोंगाळे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असून या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी भोसरी दिघी परिसरातील महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा चिटणीस कविता भोंगाळे – कडू यांनी केले.