दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून मिळणार हॉल तिकीट
ऑनलाइन माध्यमातून हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार
![10th class students will get hall ticket from the date.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/SSC-Board-780x470.jpg)
पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. परीक्षा अधिक तोंडावर आलेली असतानाच आता हॉल तिकीट कधी मिळणार याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा १ मार्च ते २६ मार्चदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी हॉल तिकीटं कधी मिळणार याची घोषणा बोर्डाने केली आहे. ऑनलाइन माध्यमातून हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे.
हॉल तिकीट कधीपासून आणि कुठून डाऊनलोड करता येणार..?
दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या परिक्षांसाठीही हॉल तिकीट महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना बुधवार ३१ जानेवारी २०२४ पासून हॉल तिकीटं डाऊनलोड करता येणार आहे. सर्व माध्यमिक शाळांच्या मार्च २०२४ च्या परीक्षेची प्रवेशपत्रे म्हणजेच हॉल तिकीटं ऑनलाइन डाऊनलोड करता येतील. बोर्डाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ‘स्कूल लॉगिन’मध्ये हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे.
या कालावधीत होणार परीक्षा..
बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच जाहीर करण्यात आल्या आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ या दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ या काळात घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणार आहे.