breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘द केरळ स्टोरी’ सिनेमावरून जितेंद्र आव्हाड आणि चित्रा वाघ यांच्यात ट्विटरवॉर

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’च्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली. तिघांचा अधिकृत आकडा ३२,००० असा अंदाज होता. या काल्पनिक चित्रपटाची निर्मिती करणाऱ्याला सार्वजनिक फाशी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दरम्यान, यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, द केरल स्टोरी चित्रपटातून मांडलेला धर्मांतरासारखा मुद्दा सत्य घटनेकडे डोळेझाक करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना गंभीर वाटत नसेल तर त्यांनाच लाज वाटवला हवी..जितेंद्र आव्हाड यांच्या आत्ता पर्यंतच्या भूमिका यात खतपाणी घालणाऱ्याच आहेत. मुळात त्यांना एवढा पुळका येण्याचं कारण समजू शकते त्यांची रोजी रोटी याच वोट बँकेवरच चालते पण वोट बँकच्या नादात तुम्ही मुंब्र्याचा छोटा पाकिस्तान तयार करण्याचं पाप केलंय हे पण विसरू नका.

हेही वाचा – पृथ्वीराज चव्हाणांची कॅटीगरी काय? शरद पवारांचा पलटवार

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. सत्य परिस्थिती केरळची वेगळीच आहे. परदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे त्याच्यातील ३६ टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी २.३६ लाख कोटी रुपये पाठवले. केरळचा साक्षरतेचा दर ९६ टक्के आहे. जो भारताचा ७६ टक्के आहे. केरळमध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणारी लोक ही ०.७६ टक्के आहेत. देशामध्ये ती २२ टक्के आहे. बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये ६ टक्के आहे. आसाममध्ये ४२ टक्के आहे आणि उत्तरप्रदेश मध्ये ४६ टक्के आहे. केरळचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या ७ टक्के अधिक आहे.

त्या चित्रपटामध्ये जी ३२ हजार महिलांची कथा सांगितली गेली, त्याबद्दल स्वतः चित्रपटाचा प्रोड्यूसर म्हणतो की ही कथा फक्त ३ महिलांची आहे. चित्रपट चालवा यासाठी ३२ हजार महिला सांगितल्या होत्या. म्हणजे एकंदरीत काय तर आपल्या महिला भगिनींची बदनामी करायची. आपल्या महिला भगिनी मूर्ख आहेत त्यांना काही समजतच नाही त्या वाटेल तश्या वागतात असे प्रदर्शित करायचं आणि शेवटी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिला ह्या गौण आहेत असं चित्र उभं करायचं. हेच केरळ वर आधारीत चित्रपटाच खरं सत्य आहे. असत्याच्या आधारावर हिंसा, द्वेष निर्माण करायचा आणि त्याच माध्यमातून पुढे निवडणूका जिंकायच्या हे गणित लावूनच असे चित्रपट काढले जातात, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button