Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचे शक्तीप्रदर्शन!

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली. उमेदवारी भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे थेरगाव- डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करुन पदयात्रेला सुरूवात करण्यात आली.

महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबत मोठी चुरस निर्माण झाली होती. या रस्सीखेचमध्ये नाना काटे यांनी बाजी मारली.

दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक २६ फेब्रुवारी रोजी होणार असल्याने, यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस पक्ष, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे,शेकाप महाविकासआघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विठ्ठल उर्फ नाना काटे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. तशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिराजवळ जमण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर पदयात्रा करीत नाना काटे यांनी डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button