चिखली TP Scheme रद्द : आमदार महेश लांडगे यांनी भूमिपुत्रांचा विश्वास जिंकला अन् विरोधकांचाही झाला ‘चेकमेट’
राजकीय कोंडीत पकडण्याचा हास्यास्पद प्रयत्न अगदी फसला : कथित पत्रपंडितांच्या हाताशी पैलवान न लागल्याची सल कायम

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चिखली-कुदवळवाडीची प्रस्तावित केलेली TP स्कीम रद्द करण्यात आली. आता चऱ्होलीकरांसाठीही लढा उभारणार, अशी रोखठोक भूमिका घेत भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी स्थानिक भूमिपुत्रांचा विश्वास जिंकला. दुसऱ्या बाजुला लांडगे यांना राजकीय कोंडीत पकडण्याचा विरोधक आणि कथित पत्रपंडितांचा हास्यास्पद प्रयत्न पुन्हा एकदा फसला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून फेब्रुवारी-2025 मध्ये भारतातील सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई झाले. राष्ट्र सुरक्षा, बांगालदेशीर घुसखोर, रोहिंग्यांचा बंदोबस्त, बेकायदेशीर भंगार दुकाने आणि इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या मुद्यावर आमदार महेश लांडगे यांनी या कारवाईचे जाहीर समर्थन केले. त्यासोबत सरसकट कारवाईमुळे भूमिपुत्रांचे नुकसान झाले, याबाबत प्रशासनाला खडेबोलही सुनावले.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने TP स्कीम राबवण्याच्या हालचाली सुरू केल्या. स्थानिक नागरिक, भूमिपुत्र, जागामालक, शेतकरी यांच्यासोबतील आमदार लांडगे यांनी TP विरोधी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. याच आंदोलनाचा आधार घेत महेश लांडगे यांना राजकीय कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू झाला. TP साठीच अतिक्रमण विरोधी कारवाई केली, असा ‘फेक नॅरेटिव्ह’ तयार करण्यात आला.
पण, राजकारणात कसलेला पैलवान महेश लांडगे ना विरोधकांच्या हाती लागले, ना कथित पत्रपंडितांच्या ‘ फेक नॅरेटिव्ह ट्रॅप’ मध्ये सापडले. लांडगेंनी भूमिपुत्रांना ‘शब्द’ दिला… ‘‘TP होवू देणार नाही’’, तो शब्द त्यांनी खरा करुन दाखवला. चिखलीच्या TP वरुन पैलावान हातीशी लागत नाही. हे लक्षात आल्यानंतर आता चऱ्होलीच्या TP वरून ग्रामस्थांना भडकावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
वास्तविक, आमदार लांडगे यांनी यापूर्वीच चऱ्होलीच्या श्री वाघेश्वर मंदिरात प्रशासन आणि ग्रामस्थ, शेतकरी, भूमिपुत्रांची बैठक घेणार आणि चिखलीच्या धर्तीवर चऱ्होलीचा TP सुद्धा रद्द करणार, असे आत्मविश्वासाने जाहीर केले आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांनी पुन्हा एकदा भूमिपुत्रांचा विश्वास जिंकला आणि विरोधक, कथित पत्रपंडितांना ‘चेकमेट’ केले आहे. कथित पत्रपंडितांच्या हाताशी पैलवान न लागल्याची सल मात्र कायम राहीली आहे.
भूमिपुत्रांसाठी महेश लांडगे आश्वासक नेतृत्त्व…
भूमिपुत्र आणि स्थानिकांच्या हक्कांसाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी लढणार असा ‘शब्द’ देत महेश लांडगे यांनी 2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी भूमिपुत्रांनी ‘अपक्ष’ असतानाही त्यांना साथ दिली. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांमध्ये महेश लांडगे यांनी शास्तीकर सरसकट माफी, नवनगर प्राधिकरण परतावा, समाविष्ट गावांच्या विकासाला चालना, मोशी कचरा डेपो बफर झोन, आंद्रा, भामा आसखेड पाणी प्रकल्प, स्पाईन रस्ता बांधितांचे प्रश्न यासह बैलगाडा शर्यत बंदी उठवण्याचा यशस्वी न्यायालयीन लढा यामुळे भूमिपुत्र, शेतकरी यांचा विश्वास जिंकला आहे. टाळगाव चिखलीमधील भारतातील पहिले जगद्गगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ असो किंवा चिखली आणि चऱ्होलीचा क-वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये समावेश असो… भूमिपुत्र, स्थानिक हा महेश लांडगे यांच्या राजकीय जीवनाचा केंद्रबिंदू राहीला आहे, असे चित्र स्पष्ट दिसते.