Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…: भाजपा विधिमंडळ गटनेतेपदी निवड!

आमदार महेश लांडगे म्हणाले; आधुनिक महाराष्ट्राचा नेता! : भाजपा नवनिर्वाचीत आमदारांची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

पुणे: भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीने महाराष्ट्र विधिमंडळ नेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी फडणवीस यांचीच वर्णी लागणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.

भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक मुंबईत सुरू असून पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची औपचारिक निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली. चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. सुधीर मुनगंटीवर, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर यांनी त्याला अनुमोदन दिले. त्यानंतर एकमताने फडणवीस यांची निवड झाली.

महायुतीत सर्वाधिक १३२ आमदार निवडून आल्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होते, मात्र भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी नावाची घोषणा केली जात नव्हती. त्याबाबतची उत्सुकता आता संपली आहे. महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा उद्या (५ डिसेंबर) शपथविधी होणार आहे.

महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून गेले काही दिवस रस्सीखेच चालू होती, मात्र भाजपने यावेळी ठाम भूमिका घेतल्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपच्या मुख्यमंत्र्यालाच पाठिंबा देणे भाग पडणार आहे. पक्षाच्या केंद्रीय निरीक्षक विजय रुपानी, निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाबद्दल विशेष अभिनंदन केले.

महेश लांडगे म्हणतात… अभिनंदन बॉस..!

आधुनिक महाराष्ट्राचे नेते तथा माझे मार्गदर्शक मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र बलशाली होईल आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास वाटतो, अशा शब्दांत पिंपरी-चिंचवड भाजपाचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button