ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंद्रायणीनगर-भोसरी प्रभागात भाजपाच्या प्रचाराचा ‘‘विजयी शंखनाद’’

मिशन- PCMC: भाग क्रमांक ८ मध्ये टू-व्हिलर रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

“एकटाच आलो नाही, युगाचीही साथ आहे” या प्रेरणादायी घोषवाक्यासह पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ८ (इंद्रायणीनगर, संतनगर भोसरी) येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य टू-व्हिलर रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या प्रचार शुभारंभात नव्या-जुन्याचा समन्वय साधणाऱ्या सक्षम उमेदवारांची ओळख नागरिकांना करून देण्यात आली. कार्यक्षम आमदार मा. महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संवेदनशील व कार्यतत्पर उमेदवार प्रभाग व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

भाजपाच्या वतीने प्रभाग क्रमांक ८ मधून श्री. मडिगेरी हनुमंतराव विलास, सौ. नम्रता योगेश लोंढे, सौ. नीलम शिवराज लांडगे आणि डॉ. सुहास लक्ष्मण कांबळे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ही सक्षम टीम प्रभागाच्या विकासासाठी नवा आत्मविश्वास देणारी ठरेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा     :        “आश्वासनांपलीकडचे नेतृत्व : प्रभाग १० च्या विकासासाठी अनुराधाताई गोरखे सज्ज” 

रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांचा जोश, नागरिकांची मोठी उपस्थिती आणि परिसरात जाणवणारी सकारात्मक ऊर्जा लक्षवेधी ठरली. एकजूट, विश्वास आणि विकासाच्या संकल्पासह प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत प्रचार शुभारंभाला बळ दिले. यावेळी उमेदवारांच्या वतीने प्रभागातील सर्व नागरिकांचे प्रेम, विश्वास आणि पाठिंब्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. अनुभव, प्रामाणिक कामकाज आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ याच बळावर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

ही रॅली केवळ प्रचाराची सुरुवात नसून, अनुभवी आणि सक्षम नेतृत्वाच्या माध्यमातून जनतेसोबत मिळून विकासाच्या दिशेने टाकलेले ठाम पाऊल असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले. इंद्रायणीनगर–भोसरी प्रभागात भाजपाच्या विजयाचा शंखनाद झाल्याची भावना या रॅलीतून प्रकर्षाने दिसून आली. मिशन PCMC अंतर्गत आयोजित या प्रचार रॅलीने आगामी निवडणुकीत भाजपासाठी सकारात्मक वातावरण निर्माण केल्याचे चित्र स्पष्ट झाले.

प्रभाग क्रमांक ८ मधील प्रत्येक नागरिकाचा विश्वास हेच माझे खरे भांडवल आहे. मूलभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि युवक–महिलांसाठी संधी निर्माण करत इंद्रायणीनगर–भोसरीचा सर्वांगीण विकास साधण्याचा माझा ठाम संकल्प आहे. जनतेसोबत, जनतेसाठी आणि जनतेच्या विश्वासावर काम करून हा प्रभाग विकासाचा आदर्श प्रभाग बनवू.

– विलास मडिगेरी, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 8 इंद्रायणीनगर-भोसरी.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button