breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

छगन भुजबळांची तोफ धडाडणार! अहमदनगरमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार

Chhagan Bhujbal | मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर ओबीसींचे आरक्षण बचावाच्या मागणीसाठी ओबीसी समाज संघटना एकटवटून आक्रमक झाल्या आहेत. मराठा आंदोलनाच्या यशानंतर ओबीसींचा पहिलाच आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा आज अहमदनगरमध्ये होणार आहे.

अहमदनगर शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर आज दुपारी ३ वाजता हा मेळावा होणार आहे. हा मेळावा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या मेळाव्याला दीड ते दोन लाख ओबीसी बांधव येतील असा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा    –    ‘मी जिवंत आहे..’ पूनम पांडेंने मृत्यूचं खोटं वृत्त पसरवलं 

या महाएल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार प्रकाश शेंडगे यांसह अनेक ओबीसी नेत्यांची उपस्थिती असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button