breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘मी जिवंत आहे..’ पूनम पांडेंने मृत्यूचं खोटं वृत्त पसरवलं

Poonam Pandey | मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिचा कर्करोगाने मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर, पूनम पांडेच्या निधनाबद्दल शंका व्यक्त केली जात होती. आता खुद्द पूनमने समोर येत ती जिवंत असल्याची माहिती दिली आहे. पूनमने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर करत तिचा मृत्यू झाला नसल्याचं सांगितलं आहे. कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी हे नाटक केल्याचं पूनमने व्हिडिओत म्हटलं आहे.

पूनम पांडेने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, तुमच्या सर्वांसोबत मला काही महत्त्वाचं शेअर करायचं आहे आणि ते म्हणजे-मी इथेच आहे, मी जिवंत आहे. मला गर्भाशयाचा कर्करोग (Cervical Cancer) झालेला नाही. परंतु, या रोगाचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे हजारो महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इतर प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच, सर्व्हायकल कॅन्सर देखील पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे.

हेही वाचा    –    लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर, पंतप्रधान मोदींची घोषणा 

लवकर या कर्करोगाचं निदान होणं आणि त्यावर HPV लस घेणं हा त्यावरचा उपाय आहे. या आजारामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही, याची खात्री आपण केली पाहिजे. या रोगाबद्दल जागरुकता पसरवून एकमेकांना सशक्त बनवूया आणि प्रत्येक स्त्रीला यावरील उपायांबद्दल माहिती मिळेल, याची खात्री करुया. चला एकत्रितपणे रोगाच्या विनाशकारी परिणामांचा अंत करण्यासाठी प्रयत्न करूया आणि #DeathToCervicalCancer चा अवलंब करुया, असं पुनमने म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button