Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

बीबीसी डॉक्यूमेंट्रीविरोधात गुजरात विधानसभेत ठराव मंजूर; कारवाईची मागणी

बीबीसी विरोधात केंद्र सरकारने कडक कारवाई करण्याची मागणी

BBC Documentary : बीबीसीने गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवर एक माहितीपट प्रदर्शित केला होता. गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा थेट संबंध आहे, असं भाष्य बीबीसीच्या माहितीपटातून चित्रित करण्यात आलं होतं. दनम्यान, या माहितीपटाविरोधात केंद्र सरकारने कडक कारवाई करावी असा ठराव गुजरात विधानसभेत मंजूर केला आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, आपले संपूर्ण जीवन देशाच्या विकासासाठी समर्पित करणाऱ्या आणि जगात भारताचे नाव उज्वल करणाऱ्या पंतप्रधान मोदींविरोधात षडयंत्र रचले जात आहे. आज संपुर्ण गुजरात पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींविरोधात षडयंत्र रचणाऱ्या ढोंगी बीबीसी विरोधात केंद्र सरकारने कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. 

दरम्यान, बीबीसीने गेल्या महिन्यात गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केला होता. ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ नावाच्या या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दोन भागांचा हा माहितीपट होता. प्रदर्शित झाल्यानंतर केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी घातली. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार हा माहितीपट यूट्यूब आणि ट्विटरवर ब्लॉक करण्याचे निर्देश जारी करण्यात आले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button