Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री मेघा धाडेची राजकारणात एन्ट्री!

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री मेघा धाडेनी राजकारणात प्रवेश केला आहे. मेघा धाडे यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डेही उपस्थित होत्या.

हेही वाचा – भाजपा युवा मोर्चातर्फे ‘मोदी@9 जनसंपर्क अभियान’ची प्रभावी अंमलबजावणी

मेघा धाडे या बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनच्या विजेत्या आहेत. बिग बॉस मराठी पहिल्या सीझनमधून मेघा धाडेला महाराष्ट्रातील घराघरात एक वेगळीच ओळख प्रप्त झाली. आपल्या दमदार खेळीने चाहत्यांना आपल्याकडे सर्वाधिक प्रभावित केले. बेधडक स्वभाव आणि बुद्धीचातुर्यामुळे त्या बिग बॉसमध्ये पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिलेल्या कंटेस्ंटट ठरल्या. त्या सध्या मनोरंजन विश्वात सक्रिय नसल्या तरी त्यांचा फार मोठा चाहतावर्ग आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button